आजीची भातुकली, पुणे
वैशिष्ठ्यपूर्ण भांडी
पुढील प्रदर्शन
तारीख : ७ ते १२ डिसेंबर
वेळ : सकाळी 11 ते 8
पत्ता : संत बहिणाबाई चौधरी, प्रतिष्ठान आंबेडकर नगर, भुसावळ
मागील प्रदर्शन
तारीख : २६, २७ मे २०१८
वेळ : सकाळी ११:०० ते रात्री ८:००
पत्ता : महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, स्काइस एक्सटेन्शन, झेड पी सोसायटी, कोल्हापुर.
मागील इतर प्रदर्शने
विशेष माहिती
भातुकलीचे प्रदर्शन डोहाळेजेवण, बारसं, वाढदिवस, मुंज, वास्तुशांती अशा समारंभात आपण आयोजित करू शकता .
संग्रहक

श्री.विलास नारायण करंदीकर

मुख्य पान भातुकली वैशिष्ठ्यपूर्ण भांडी अभिप्राय छायाचित्रे संपर्क
Welcome
मागील पान छापील प्रत
पंगत

हल्लीच्या मुलांना ’पंगत’ हा शब्दपण माहीत नाही. टेबल खुर्चीवर बसून आपलं आपण वाढून घेऊन साधारणपणे एकट्यानेच जेवण उरकायचे आणि पळायचे आपापल्या उद्योगाला. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुळातच घरात माणसे तीन किंवा चार. ती एका वेळी घरात सापडणं मुश्कील. त्यामुळे एकावेळी जेवणं दूरच. ’पंगत' हा एक थाट होता.

एका ओळीत पाट मांडून पाटापुढे ताटे मांडली जात. डाव्या हाताला पाण्याचे भांडे. ताटाच्या उजव्या बाजूला वाट्या मांडून ठेवत. ताटाभोवती रांगोळी काढत. उदबत्त्या लावल्या जात. अशा प्रसन्न वातावरणात जेवण होत असे. पंगतीत पुरुष मंडळी उघड्या अंगाने जेवावयास बसत. सर्वांना गंध लावले जाई. गंध ही एक खूण असे. गंध ज्याच्या कपाळी असे त्याचे

जेवण झाले असे समजत असत. शैव आडवे गंध लावायचे. वैष्णव उभं गंध लावायचे. सर्वांच्या पानापुढे दक्षिणा ठेवली जाई. गृहिणी सुंदर पोषाखात वाढायला यायच्या. प्रेमानी आग्रहानी वाढायच्या. सर्व पदार्थ सर्वांना वाढून झाले की मग श्लोक म्हटला जाई आणि मग जेवणाला सुरुवात होत असे. ताटात षड्‌रसांचा समावेश असे. मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, भजी, पोळी, आमटी, भाजी, वरण-भात इत्यादी. पंगतीला सुरुवात झाली की आग्रह करून वाढले जायचे. पानात टाकायला परवानगी नसे. ताक-भात सर्वात शेवटी वाढला जात असे. त्यानंतर वाटीत शेवटी ताक वाढलं जात असे. हात धुवून झाल्यावर ’विडा'/ पान-सुपारी काहीतरी एक ठेवत. असे आरोग्यपूर्ण जेवण होत असे.