भारावून गेलो आम्ही
तुमचे संकलन बघूनी ।
ळलेच नाही केंव्हा पोहोचलो
लीलया आमचे बालपणी ॥
विलास नारायण करंदीकर
१४०२ ब, शुक्रवार पेठ, कृष्णकृपा,
बदामी हौदाजवळ, पुणे- ४११ ००२.
दूरध्व्नी: २४४८०२७९
 
जन्म : ३०-०५-१९४७ पुणे.
शिक्षण : एस.एस.सी.( नूमवि हायस्कूल,पुणे १९६३)
तांत्रिक शिक्षण : एन.सी.टी. व्ही. कोर्स- कूपर इंजि. लि. चिचवड
नोकरी : अप्रेन्टीस- नोकरी कूपर इंजि. लि . चिंचवड १९६४ ते १९६९
मॅथर- ग्रीव्ह्ज (व्हर्टीकल बोअर १९६९ ते १९७४ )
थिसेन्स ग्रुप (बुकाव वुल्फ़ १९७४ ते २००२)
स्वेच्छानिवृत्ती : प्रदर्शने भरविण्यास वेळ कमी पडू लागल्याने.(२००२)
महाराष्ट्रातील भातुकलीचा सर्वत्र प्रसार व्हावा मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, पुढील पिढी संस्कारक्षम व्हावी म्हणून ही भातुकलीची प्रदर्शने मी सर्वत्र भरवतो. आजपर्यंत १५० प्रदर्शने झालेली आहेत. तसेच इ- टीव्ही, अल्फा टीव्ही, एनडी टीव्ही, सहारा, मुंबई दूरदर्शन, हॅलो इंडिया या दूरदर्शन केंद्रांवरून वेळोवेळी त्याचे प्रक्षेपण झालेले आहे. सकाळ, म. टा., सामना, लोकसत्ता, तरुण भारत या वृत्तपत्रांनी वेळोवेळी त्याची दखल घेतलेली आहे. तसेच लिमका बुक मध्ये याची नोंद घेतलेली असून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डसने प्रशंसा केलेली आहे.
आजपर्यंत सुमारे २५००० लोकांनी लेखी अभिप्राय देऊन त्या बद्दल आपला आनंद व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये स्वामी स्वरुपानंद सरस्वती, फुलगांव, मंगेश पाडगावकर, अरुण दाते, शरद पवार यांचे अभिप्राय उल्लेखनीय आहेत. जगात कोणाकडेही भातुकलीची २५०० भांडी नाहीत.
अनेक मासिकांमध्ये- पुस्तकांमध्ये साप्ताहिकांत उदा. माहेर- छंद- चित्रलेखा -विवेक- मार्मिक, लोकांनी उस्फुर्तपणे लेख लिहिलेले आहेत. ह्या प्रदर्शनामध्ये कोणत्याही वस्तूची विक्री होत नाही हेच या प्रदर्शनाचे वैशिष्ठय.
तसेच भातुकलीच्या भांडयाचे प्रदर्शनाबरोबर पूर्वीचे, घरा-घरांतले, अंगणातले विस्मृतीत गेलेले ४० प्रकारचे खेळ (उदा. सागर गोटे,भोवरे, विटी- दांडू इ.)हेहि प्रदर्शनात पहावयास मिळतील. हे प्रदर्शन कायम स्वरुपी असावे म्हणून समाजातीलच लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे. कारण "करंदीकर आज आहेत उद्या नाहीत" पण "भातुकली’ प्रदर्शन रूपाने का होइना जीवंत राहिली पाहिजे.
सगळ्यात महत्वाचे या प्रदर्शनामध्ये माझी पत्नी सौ. अश्विनी हिचा सिंहाचा वाटा आहे. तिने साथ दिली नसती तर ही प्रदर्शने झाली नसती.
धन्यवाद .!‍