मागील पान        पुढील पान

पुर्वीच्या काळातील तांबे पितळेची भातुकलीची भांडी खेळावयास मिळतील.

संपर्क :
श्री. विलास करंदीकर
दुरध्वनी क्र. +91 20 24480279

 

"भातुकली" या एका शब्दामधेच बालपण उभं करण्याची ताकद आहे. ती दर्शविली आहे भातुकलीच्याच तांबे-पितळेच्या थोडया थोडक्या नव्हे तर ३००० चिमुकल्या भांडयांमधून. एकोप्याची भावना निर्माण करणारा हा नुसता खेळ नव्हे, तर एक संस्कारही आहे. भातुकलीच्या खेळामधून मुलामुलींवर संस्कार होतात. काळाच्या ओघात नाहिसा होणारा हा ठेवा आवर्जून जतन केला जात आहे प्रदर्शनाच्या माध्यमातून. विस्मृतीत गेलेल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आवर्जून पहावा असा हा आजीच्या भातुकलीचा संसार. काळाच्या आड गेलेले स्मृतीतले, विस्मृतीतले, घराघरातले अन्‌ अंगणातले ५० प्रकारचे खेळही या प्रदर्शनात पाहता येतील.