आजीची भातुकली, पुणे
वैशिष्ठ्यपूर्ण भांडी
पुढील प्रदर्शन
तारीख : ७ ते १२ डिसेंबर
वेळ : सकाळी 11 ते 8
पत्ता : संत बहिणाबाई चौधरी, प्रतिष्ठान आंबेडकर नगर, भुसावळ
मागील प्रदर्शन
तारीख : २६, २७ मे २०१८
वेळ : सकाळी ११:०० ते रात्री ८:००
पत्ता : महालक्ष्मी सांस्कृतिक भवन, स्काइस एक्सटेन्शन, झेड पी सोसायटी, कोल्हापुर.
मागील इतर प्रदर्शने
विशेष माहिती
भातुकलीचे प्रदर्शन डोहाळेजेवण, बारसं, वाढदिवस, मुंज, वास्तुशांती अशा समारंभात आपण आयोजित करू शकता .
संग्रहक

श्री.विलास नारायण करंदीकर

मुख्य पान भातुकली वैशिष्ठ्यपूर्ण भांडी अभिप्राय छायाचित्रे संपर्क
Welcome
मागील पान छापील प्रत
आंघोळीसाठी वापरली जाणारी भांडी
पाणी तापविण्याचा बंब

पूर्वी आंघोळीचे पाणी तापविण्यासाठी तांब्याचा बंब असे.
शेजारी चित्रात दाखविल्याप्रमाणे मोठे भांडे असे व त्याच्यामधोमध उभा एक पाइप खालपर्यंत गेलेला असे. त्यातून जळाऊ वस्तू म्हणजे शेंगांची फोलपटं ऊस खाऊन झाल्यावर वाळवलेल्या चोळट्या, झाडाचा पालापाचोळा, शेण्या असे साहित्य असे. हल्ली कच-याचा प्रश्न ऐरणीवर आहे त्याला हे एक उत्तरच होते. त्यामुळे बचतही होत असे. सकाळी लवकर उठून एकाला बंब पेटविण्याचे काम असे. ह्यातून अनेक गोष्टी साधत असत. ती व्यक्ती कामात गुंतून राहात असे व बंबात जाळण्यासाठी टाकलेल्या गोष्टींची राख भांडी घासण्यासाठी वापरता येत असे तसेच त्यात दात घासण्यासाठी राखुंडीपण मिळत असे. शिवाय त्याचा जो धूर होत असे त्यामुळे डासांना हाकलण्याचे काम आपोआपच होत असे. हा बंब तांब्याचा असल्याने पाणी शुद्ध होण्यास मदत होत असे. बंबाच्या मुख्य भांड्यात पाणी तापत असेच शिवाय मधल्या पाईपमधून ज्या ज्वाळा येतात त्या पाईपवरपण एक पातेले ठेवले की तेही तापून निघत असे. असे विविध उपयोग ह्या बंबाचे होत असत. मी एक छोटासा बदल या बंबात केला आहे. तो शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित आहे. पाणी गरम झाले की ते वर येते. या तत्त्वाला धरून बंबात थोडासा बदल केला आहे. जुन्या बंबाला एकच तोटी आहे. परंतू ह्या नव्या बंबाला दोन तोट्या आहेत. एका तोटीतून गरम पाणी येते व दुस-या तोटीतून गार. एका नळाला कॉक नाही. कारण त्या नळाला आतून एक पाईप जोडलेला आहे व तो भांड्याच्या तीन चतुर्थांश उंचीपर्यंत आहे. तसेच बंबात भर घालण्यासाठी जे नरसाळे वापरतो त्याची नळी लांब आहे जेणेकरून गार पाण्याची त्यात भर घातली की ते पाणी एकदम बंबाच्या तळाशी जाऊन पोहोचते. भर घातल्याने पाण्याची पातळी वाढली की जी कॉक नसलेली तोटी आहे त्यातून गरम पाणी येऊ लागते. म्हणजे जेवढी भर जास्त तेवढे गरम पाणीपण जास्त मिळत असे. भर घालायचा आळस यातून टळेल असा दृष्टिकोण. असा हा आधुनिक बंब. अशाप्रकारे बंब या एका गोष्टीतून अनेक गोष्टी साध्य केल्या जात असत.